तळोजामध्ये एकाच कुटुंबांतील चौघांचा मृतदेह आढळला

तळोजा फेज वन येथे सेक्टर ९ मधील    शिव कॉर्नर सोसायटीत राहणाऱ्या चौघांचे मृतदेह आढळले आहेत. यात पती-पत्नी आणि दोन लहान मुलांचा समावेश आहे.मिळालेल्या माहितीनुसार, हे कुटुंब येथे भाडेत्तवावर राहत होते. पतीने पत्नीसह आपल्या दोन लहान मुलांची हत्या करुन स्वत: गळफास लावून आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. हे मृतदेह गेल्या काही दिवसांपासून फ्लॅटमध्ये पडून होते, अशी माहिती पुढे येत आहे.
या प्रकरणाचा पोलिसांकडून पुढील तपास सुरु आहे.